ऑनलाईन टीम / चेन्नई :
पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे देशातील सामान्य माणूस खूप अस्वस्थ आहे. अशा परिस्थितीत तामिळनाडूमधील स्टालिन सरकारने सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज तामिळनाडूमध्ये सादर करण्यात आला. अर्थमंत्री पी. टी. आर. पालनिवेल ठियागा राजन यांनी शुक्रवारी आपला पहिला पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये तामिळनाडू सरकारने राज्य उत्पादन शुल्कात कपात करताना पेट्रोलचे दर तीन रूपयांनी कमी करत असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान राज्यात 2.6 कोटी नागरिक दुचाकीवरून पब्वास करतात. या सर्व नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे राज्य सरकारला यावषी 1,160 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, तामिळनाडूनंतर इतर राज्येही पेट्रोलवरील कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देऊ शकतात. कारण एप्रिल 2020 पासून आतापर्यंत दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 32.25 रुपये प्रतिलिटर वाढ झाली. ते प्रतिलिटर 69.59 रुपयांवरून 101.84 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढले. त्याचबरोबर या काळात डिझेलच्या किंमतीत 27.58 रुपये प्रति लीटरने वाढ झाली. पेट्रोलची ही किंमत 62.29 रुपये प्रति लीटरवरून 89.87 रुपये प्रति लीटर झाली.
दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रूपये प्रति लीटर पेक्षा अधिक आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब आदि राज्यांचा समावेश आहे.









