ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सोमवारी कोरोना रुग्ण संख्येसोबतच दैनंदिन मृतांच्या संख्येत देखिल घट झालेली पहायला मिळाले. मागील 24 तासात देशात 39 हजार 937 नवे रुग्ण आढळून आले. तर 417 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 22 लाख 25 हजार 513 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4,31,642 जणांनी आपला जीव गमावला आहे.
बुधवारी देशात 35 हजार 909 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 11 हजार 924 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 3 लाख 81 हजार 947 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशातील 54 कोटी 58 लाख 57 हजार 108 जणांना लस देण्यात आली आहे.
- गुजरातमधील 8 शहरांमध्ये वाढवले लॉकडाऊन
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत गुजरातमधील 8 शहरांमध्ये 28 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. एका अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद, वडोदरा, सुरत, राजकोट, जुनागड, भावनगर, जामनगर आणि गांधीनगरमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू जारी करण्यात आला आहे.
- केरळमधील रूग्णसंख्येत वाढ
रविवारी केरळमधील मल्लपुरम, तृश्शुर, कोझीकोड, एर्णाकुलममध्ये सर्वाधिक रूग्ण आढळून आले. येथे एका दिवसात 2 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहीती समोर आली आहे. त्यामुळे केरळमधील सर्व राज्यांमध्ये सध्या एकूण 4,99,000 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.









