ऑनलाईन टीम
कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नुकसान भरपाईबाबत आज, सोमवारी अंतिम निर्णय देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या मागील सुनावणीत, केंद्र सरकारने पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची भरपाई देण्याचे मान्य केले होते. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार कुटुंबीयांना ५०,००० रुपयांची भरपाई देणार आहे. केंद्र सरकारने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. विशेष म्हणजे, मृत्यूच्या दाखल्यात कोरोनामुळे मृत्यू झाला, असा उल्लेख नसेल तरी त्या व्यकीच्या कुटुंबीयांना मदत मिळणार आहे.
देशात कोरोनामुळे मरण पावलेल्या सर्वांना ५०,००० रूपये भरपाईची रक्कम देण्याच्या केंद्राच्या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोविड -१९ पीडितांना भरपाईची रक्कम भरपाई देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी एनडीएमएला निर्देश देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आदेश दिला आहे.
न्यायमूर्ती एम आर शाह यांनी सोमवारी सुनावणी दरम्यान सांगितले की, “मृतांच्या पुढील नातेवाईकांना ५०,००० रुपये दिले जातील आणि ते विविध कल्याणकारी योजनांअंतर्गत केंद्र आणि राज्याने दिलेल्या रकमेपेक्षा जास्त असतील असे म्हटले आहे. कोर्टाने पुढे म्हटले आहे की, ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीतून असेल. भरपाईची रक्कम अर्जाच्या ३० दिवसांच्या आत वितरित करावी लागेल आणि मृत्यूचे कारण कोविड -१९ म्हणून प्रमाणित केले जाईल. निकालाच्या तारखेनंतर होणाऱ्या मृत्यूंसाठी भरपाईची रक्कम दिली जात राहील असे न्यायमूर्ती एम आर शाह यांनी असेही म्हटले आहे.
याआधी मोदी सरकारने कोरोना योध्दांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियासाठी मोठी घोषणा केली होती. मात्र नंतर यात बदल करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या या निर्णयानंतर सर्वसामान्य कुटुंबियातील जर कर्ता पुरुष मरण पावला असेल तर अशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








