अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 28 ऑगस्ट 2021, सकाळी 10.10
●15,419 टेस्ट तर 540 जण नवीन बाधित
●कित्येक दिवसांनी पॉझिटिव्हीटी रेट 3.5 टक्क्यांवर
●गाव पातळीवर लसीकरणासाठी उडतेय झुंबड
●सातारा, फलटणची चिंता कायम
●मृत्यू दर झाला कमी
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील सुमारे 35 लाख लोकसंख्यापैकी 17 लाख 60 हजार 654 जणांचे नमुने तपासणी करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 2 लाख 38 हजार 199 जण कोरोना बाधित झालेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 2 लाख 25 हजार 618 जण बरे झाले असून 5 हजार 976 जणांचा मृत्यू झालेला आहे. हा आठवडा जिल्हा वासीयांना दिलासा देणारा ठरला असून, आठवड्याची पॉझिटिव्हीटी 4.3 टक्के एवढी आली आहे. काल दिवसभरात 15 हजार 419 जणांचे नमुने तपासणी करण्यात आले तर 540 जण नवीन कोरोना बाधित आढळून आले असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी एवढा आलेला आहे.
सातारा, फलटणला ब्रेक लागेना
सातारा तालुका कोरोना आकडेवारीत गेल्या सोळा महिन्यापासून पुढे आहे ते अद्यापपर्यंत. तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या जनजागृती झालेली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता रुग्ण संख्या कमी झालेली असली तरी प्रमाण चिंताजनक असे राहिले आहे. सातारा शहरात आता कोरोनाची एवढी रुग्ण संख्या दिसत नसली तरी बाहेरून उपचारासाठी येणाऱ्यामुळे रुग्ण संख्या जास्त दिसते आहे. होम आयसोलेशनमुळे कोरोना वाढतो आहे. असे म्हटले जात असले तरी होम आयसोलेशनमध्ये रुग्ण उपचार घेण्याऐवजी सरकारी किंवा खाजगी दवाखाना गाठत आहेत. प्रत्येकाला स्वतःच्या मरणाची भीती आहे. फलटण तालुका ही गेल्या 27 दिवसात टप्याटप्याने उसळी घेत असून हे दोन्ही तालुके चिंतेची बाब बनू लागले आहेत.
आठवड्यातला पॉझिटिव्हीटी रेट उतरू लागला
आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट उतरू लागला आहे. तो 4.3 टक्क्यांवर आला आहे. तो पुढीलप्रमाणे:
दि.21 ला तपासणी 13,605, पॉझिटिव्ह 692, पॉझिटिव्हीटी 5.1
दि.22 ला तपासणी 11,629, पॉझिटिव्ह 480, पॉझिटिव्हीटी 4.1
दि.23 ला तपासणी 13,969, पॉझिटिव्ह 528, पॉझिटिव्हीटी 3.8
दि.24 ला तपासणी 15,337, पॉझिटिव्ह 635, पॉझिटिव्हीटी 4.1
दि.25 ला तपासणी 16,424, पॉझिटिव्ह 861, पॉझिटिव्हीटी 5.2
दि.26 ला तपासणी 15,064, पॉझिटिव्ह 594, पॉझिटिव्हीटी 3.9
दि.27 ला तपासणी 15,414, पॉझिटिव्ह 540, पॉझिटिव्हीटी 3.5
एकूण आठवड्यात 1,01,442 एवढ्या तपासण्या झाल्या असून, 4,330 जण पॉझिटिव्ह आले तर 4.3 एवढा पॉझिटिव्हीटी रेट आहे.
ग्रामीण भागात लसीकरणाला गर्दी
शहरात लसीकरण केंद्रावर ऑन लाईन नोंदणी करण्यासाठी कोव्हिन पोर्टलवर जावे लागते. मात्र, गावोगावी लस कधी येणार आणि आपल्याला कधी मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा असतात. लस गावात आली की त्या गावचे पुढारी मंडळी आपल्या च जवळच्याना कशी लस मिळेल. यासाठी आरोग्य यंत्रणेवर दबाव आणत असताना चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. सामान्य मात्र लस कधी मिळेल याकडे नजर लावून बसला आहे. गाव पुढारी मात्र स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. लसीकरण करण्यामध्ये पुढाऱ्यांपेक्षा आरोग्य यंत्रणेला मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यातील 17 लाख 44 हजार 230 जणानी लस घेतली तर पहिला डोस 12 लाख 25 हजार 395 जणांनी पहिला डोस तर दुसरा डोस 5 लाख 18 हजार 835 जणांनी घेतला आहे. सगळ्यात जास्त क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात लसीकरण झाले असून, 71 हजार जणांनी लस घेतली आहे.
शनिवारपर्यंत
एकूण नमूने – 17,60,654
एकूण बाधित – 2,38,199
घरी सोडण्यात आलेले 2,25,618
मृत्यू -5,976
उपचारार्थ रुग्ण- 9,384









