बंगळूर/प्रतिनिधी
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाने जगाची चिंता वाढवलेली असतांना पर्यावरणाच्या दृष्टीने एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. जगातील काही संस्थांनी पर्यावरणाविषयी केलेल्या अभ्यासावरून पर्यावरणातील प्रदूषण काही प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळाले आहे. लॉकडाऊन दरम्यान ग्रीनहाऊस वायू आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनातही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. वाहनांची वर्दळ कमी झाल्याने आणि उद्योग बंद पडल्याने जीवाश्म इंधनाचे ज्वलन थांबले, त्यामुळे त्याचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम झाला. जगभरात अनेक संस्था लॉंकडाऊन नंतर प्रदूषणात किती प्रमाणात घट झाली याचा अभ्यास करताना पाहायला मिळत आहेत. या संदर्भात अमेरिकेची अंतराळ संस्था नासा, युरोपियन अंतराळ संस्था ‘ईसा’ आणि जपानी अवकाश एजन्सी जॅक्स यांनी पहिल्यांदा लॉकडाऊन दरम्यान पृथ्वी आणि पर्यावरणीय बदलांचा अभ्यास केला. यासाठी तिन्ही एजन्सींनी त्यांच्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहांद्वारे डेटा गोळा केला. एप्रिलमध्ये या तिन्ही संस्थांनी संयुक्त टास्क फोर्सची स्थापना केली. या फोर्सने यासर्व अभ्यासासाठी उपग्रहाद्वारे योग्य डेटा गोळा केला होता. याया डेटाद्वारे अभ्यास करण्यात आला आहे.
भारतासंदर्भात या अभ्यासातून सुरवातीला असे दिसून आले की लॉकडाऊनमुळे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होते. या अभ्यासात नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये समान परिणाम आढळले. नासाच्या उपग्रह आर्बिट्रेटिंग कार्बन वेधशाळा -२ (ओसीओ -२) आणि जपानच्या उपग्रह ग्रीनहाऊस गॅसेस ऑब्झर्वेशन उपग्रह (जीओएसएटी) ने मुंबई, टोकियो, न्यूयॉर्क, बीजिंग इत्यादी शहरातील कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचा मागोवा घेतला. या अभ्यासातून असे दिसून आले की, परिणाम दर्शवितो की कार्बन उत्सर्जन प्रत्येक प्रदेशात 0.5 पीपीएम (प्रति दशलक्ष भाग) किंवा 0.125 टक्क्यांनी कमी झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









