जिल्ह्याचा मृत्यूदर 3.45 वरून 2.35 वर
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र मृत्यदर रोखण्यात आरोग्य विभागाला यश येत आहे. मृत्युदर 3.45 वरून 2.35 वर आला असून ही खूपच चांगली बाब असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना बाबत आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करताना मृत्यूदर कमी करण्यात आपल्याला यश येत आहे. तसेच गेल्या महिन्यात बरे होण्याचे प्रमाण 57 टक्के होते. आता 65 टक्के झाल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. कोरोनाची लक्षणे दिसल्यावर रुग्ण त्वरित उपचारासाठी दाखल होत आहेत ही देखील बाब दखलपात्र असल्याचे त्यांनी सांगितले.









