ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र, मुंबई शहरातून आज एक दिलासादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मुंबई मध्ये मंगळवारी केवळ 700 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच आजच्या दिवशी सर्वाधिक म्हणजेच 8776 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

पुढे ते म्हणाले, बीएमसीद्वारा करण्यात आलेल्या सुरू करण्यात आलेल्या ‘चेंज द व्हायरस’ अभियाना च्या अंतर्गत मुंबईत अधिक मोठ्या प्रमाणात परीक्षण केले जाणार आहे. हे अभियान पूर्ण महाराष्ट्रात जारी करण्यात येणार आहे.
याआधी रविवारी मुंबईमध्ये कोरोनाचे 1033 रुग्ण आढळले होते. दरम्यान, आता मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा अवधी आता वाढून 68 दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73 टक्के आहे. तर 20 ते 27 जुलै या कालावधीत मुंबईतील कोरोना रुग्णांचा ग्रोथ केवळ 1.3 टक्के एवढाच राहिला आहे.
दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 182 रुग्ण आढळले असून सध्या 21 हजार 812 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर राज्यात सध्या 1,47,896 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2 लाख 21 हजार 944 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 13883 लोकांनी आपला जीव गमावला आहे









