ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 26,408 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 8 लाख 84 हजार 341 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 73.17 % आहे.

दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 20,598 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 12 लाख 08 हजार 642 वर पोहचली आहे. सध्या 2 लाख 91 हजार 238 रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी दिवसभरात 455 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 32 हजार 671 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.7 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 58 लाख 72 हजार 241 नमुन्यांपैकी 12 लाख 08 हजार 642 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 18 लाख 49 हजार 217 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 644 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- शहरे कोरोनामुक्त रुग्ण संख्या
- मुंबई : 1,47,807
- ठाणे : 1,36,485
- पुणे : 1,81,103
- नाशिक : 48,127
- नागपूर : 43,460








