ऑनलाईन टीम
देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याचे केंद्रीय आरोग्य पथकाकडून सांगितले जात होते. मात्र अद्याप कोरोनाचा धोका टळला नसला तरी देशासाठी मोठी दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात गेल्या चोवीस तासात बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २७ हजार २५४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, दुसरीकडे तब्बल ३७ हजार ६८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, कोरोनामुळे २१९ जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ३२ लाख ६४ हजार १७५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण ३ कोटी २४ लाख ४७ हजार ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, सद्यस्थितीत देशात ३ लाख ७४ हजार २६९ इतके रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









