ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील 24 तासात 2975 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत 2 लाख 84 हजार 844 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सोमवारी दिल्लीत 1849 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 11 हजार 188 वर पोहचली आहे. यामधील 20,535 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 36 लाख 59 हजार 366 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 10,260 आरटीपीसीआर टेस्ट आणि 25,687 रैपिड एंटिजेन टेस्ट सोमवारी एका दिवसात करण्यात आल्या.