ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमधून दिलासादायक बाब समोर आली आहे. आज दिवसभरात 1,399 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 61,351 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 21,896 रुग्ण जम्मूतील तर 39,455 जण काश्मीरमधील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 975 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 78 हजार 228 वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 591 आणि काश्मीर मधील 384 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 15 हजार 646 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 8,885 आणि काश्मीरमधील 6,761 जण आहेत.
- आतापर्यंत 1231 जणांचा मृत्यू
तर आतापर्यंत 1231 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 376 जण तर काश्मीरमधील 855 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 21 हजार 523 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 15 हजार 646 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.









