बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी राज्यात २,५७६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही जास्त आहे. सोमवारी राज्यात ५,९३३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले, ज्यामुळे कोरोनाची सक्रिय रूग्ण संख्या ९७,५९२ वर पोहोचली आहे. तर सोमवारी राज्यात कोरोना संसर्गामुळे ९३ लोक मरण पावले आहेत. सोमवारी राज्यात सकारात्मकता दर १.९२ टक्के होता.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेंगळूर शहरी जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. सोमवारी जिल्ह्यात ५६३ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. याच वेळी १,५८८ रुग्ण कोरोनावर विजय मिळवून रुग्णालयातून घरी परतले. तर कोरोनामुळे १८ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.









