ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हा प्रश्न गेले काही दिवस चर्चेत होता. दरम्यान, या प्रश्नावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट केल्यानंतर या संदर्भातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय घेण्यात आला असल्याचे राऊत म्हणाले.

संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘ममता बॅनर्जी बंगालची खऱ्या वाघ आहेत. त्यामुळे शिवसेना निवडणूक न लढवता ममता दिदींना पाठिंबा देणार आहे.’
गेले काही दिवस अनुत्तरित असणाऱ्या प्रश्नाला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीबाबत संजय राऊत यांनी शिवसनेनेचा निर्णय ट्वीट केला आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, अनेकजणं हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की, पश्चिम बंगालमधील निवडणूक शिवसेना लढवणार की नाही? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करून त्याबाबतीत हे अपडेट देत आहोत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, पुढील काही महिन्यांत केरळ, पुदुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता दीदी सरकार स्थापन करतील असा अंदाज वर्तवण्यात गेट आहे.








