पोलिसांनी काही तासात गुन्ह्याचा छडा लावला,आरोपी अटकेत
दिघंची /वार्ताहर
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे संतोष रामचंद्र यादव (वय 32) या युवकाचा त्याचाच सख्खा भाऊ गणेश रामचंद्र यादव याने मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास दगडाने ठेचून हत्या केली. या गुन्ह्याचा छडा आटपाडी पोलिसांनी काही तासातच लावून आरोपीस अटक केली. या घटनेमुळे दिघंची सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिघंचीमध्ये महावितरण कार्यालयाच्या पाठीमागे डोक्यावर गंभीर जखमा करून एका युवकाची हत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक कांबळे यांनी तात्काळ भेट दिली. सभोवतालच्या परिस्थितीनुसार अवघ्या दोन तासात गुन्ह्याचा छडा लावून आरोपी गणेश यादव याला अटक करण्यात आली.
मयत संतोष हा दारूच्या आहारी गेला होता. दारूच्या नशेत तो घरातील आईवडील व इतर लोकांना त्रास देत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून दिघंची एमेसिबी बोर्डाच्या पाठीमागे गणेश रामचंद्र यादव याने त्याचा सख्खा भाऊ यादव याचा दगडाने गंभीर जखमी करून हत्या केली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








