दिघंची / वार्ताहर
दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या रिजवाना दस्तगीर शेख यांच्या क्वार्टर मधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे चार तोळे सोने, रोख वीस हजार रुपये असा मोठा ऐवज लंपास केला. सध्या कोरोना ग्रस्तांच्या सेवेमध्ये असणाऱ्या आरोग्य सेविकेच्या घरातच संवेदनशून्य चोरट्यांनी हात साफ केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रिजवाना शेख या गेली तीन वर्षापासून दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका म्हणून सेवा बजावत आहेत. कोरोना महामारीच्या काळात देखील त्यांनी दिवस रात्र अतिशय उत्कृष्ट सेवा बजावली आहे. दिवस रात्र कोरोनाग्रस्तांच्या व अन्य रुग्णांच्या सेवेसाठी धावपळ सुरू असताना बुधवारी 23 सप्टेंबर रोजी दुपारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी रिजवाना शेख यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या कपाटा मधील सुमारे चार तोळे सोने,चांदीची काही दागिने व रोख 28 हजार रुपये असा मोठा ऐवज लंपास केला. एकीकडे शेख या रुग्णांची सेवा बजावत आहेत. तर त्याच वेळी संवेदनहीन चोरट्यांनी रिजवाना शेख यांच्या घरा मधील ऐवज मोठा ऐवज लंपास केला.
सदर घटना घडल्याची कळताच पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ श्वानपथकाला पाचारण करण्यात आले त्याचबरोबर हातांचे ठसे देखील तपासण्यात आले आहेत. याबरोबरच युद्धपातळीवर या चोरीची तपासणी मोहीम आटपाडी पोलिसांनी हाती घेतली आहे. तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन लवकरात लवकर या चोरीचा छडा लावण्याच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








