ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती यायला सुरुवात झाली असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मतमोजणीच्या काही फेऱ्यानंतर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस प्रणित महाआघाडीने आघाडी घेतली आहे. महाआघाडी 107 जागांवर पुढे आहे. तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए 103 जागांवर आघाडीवर आहे. लाजपा 7 तर इतर पक्ष 6 जागांवर पुढे आहेत. मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव आणि त्यांचा भाऊ तेज प्रताप यांनी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, सुरूवातीचे कल हाती येताच राजदच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.









