क्षमता 40 लाख टन करण्याचे संकेत
वृत्तसंस्था / कोलकाता
दालमिया सिमेंट (भारत) लि. आपल्या पश्चिम बंगालमधील प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी जवळपास 360 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून या गुंतवणुकीच्या मदतीने उत्पादन 23 लाख टनांनी वाढविण्यावर भर देणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. यासोबतच पश्चिम मिदनापूर जिल्हय़ात असणाऱया प्रकल्पाची क्षमता ही वार्षिक पातळीवर वाढवून 40 लाख टन करणार असल्याची माहिती कंपनीच्या एका अधिकाऱयाने दिली आहे. देशातील सिमेंट बाजारातील पुरवठा वाढला असल्याने किमतीचा कल दबावात राहिल्याच्या वातावरणात कंपनीने ही घोषणा केल्याने याचा परिणाम येत्या काळात काय राहणार आहे, हे पाहणे गरजेचे असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
विस्तार क्षमतेमुळे पश्चिम बंगालमधील सिमेंट उत्पादनाची एकूण क्षमता वाढून वार्षिक 2.9 कोटी टन होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी कंपनीने आराखडा आखला आहे.









