`भाजप’चा अंबाबाई मंदिर उघडण्यासाठी महाद्वारासमोर घंटानाद, शंखनाद,
प्रतिनिधी/कोल्हापूर
दुसऱया लाटेनंतर राज्यात सर्व व्यवहार सुरू झाले, मग मंदिरेच बंद का, असा प्रश्न करत भारतीय जनता पक्षाने येथील अंबाबाई मंदिरासमोरील महाद्वारात सोमवारी दुपारी घंटानाद, शंखनाद आंदोलन केले. तसेच दहा दिवसांत मंदिरे खुली करण्याचा निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा भाजप पदाधिकाऱयांनी यावेळी दिला.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवारी राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात भाजपने अंबाबाई मंदिरासमोर महाद्वार चौकात शंखनाद, घंटानाद आंदोलन केले. बिनखांबी गणेश मंदिरापासून भाजपचे पदाधिकारी महाद्वार चौकात आले. महाद्वारासमोर भाजप महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला, तर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घंटानाद, शंखनाद करत घोषणाबाजी केली. उद्धवा…दार उघड…, मॉल्स सुरू.. दुकाने सुरू.. मग मंदिरेच बंद का..असे फलक उंचावत राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
आंदोलनात भाजप महानगर प्रवक्ते अजित ठाणेकर, विजय जाधव, अशोक देसाई, विराज चिखलीकर, डॉ. राजवर्धन, संजय जासुद, धीरज पाटील, आशिस् कापडीकर, विवेक कुलकर्णी, महिला आघाडीतील गायत्री राऊत, आसावरी जुगदार, सुजाता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी सहभागी झाले. गणेश, अंबाबाईच्या आरतीने आंदोलनाची सांगता झाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









