बांदा / प्रतिनिधी-
गोव्याहून पुणे येथे बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो टेम्पो वर बांदा टोल नाका येथे कारवाई केली.या कारवाईत 5 लाख 19 हजार 120 रुपयाचे गोवा बनावटीच्या दारूचे 64 बॉक्स व 5 लाख किमतीचा बोलेरो टेम्पो व मोबाईल वैगरे असा एकूण 10 लाख 37 हजार 120 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.तर बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी विलास प्रल्हाद राखपसरे(36) व भावेश गबा पाटील (38) (दोघेही रा.औंध ता.हवेली,जिल्हा पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले हि कारवाई सकाळी 10च्या सुमारास कोविड साठी लावण्यात आलेल्या सीमा तपासणी नाका येथे केली