कुपवाड / प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यंदाही समस्त कुपवाडकरांच्यावतीने ३१ डीसेंबर रोजी रात्री सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे उत्साही स्वागत असा संयुक्त कार्यक्रम घेऊन ‘दारू नको- दूध प्या’ असा समाजोपयोगी संदेश देत मसाला दूधाचे वाटप करण्यात आले.
कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती, कुपवाड शहर व्यापारी संघटना, कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाणे व कुपवाड शहर मराठी पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सोसायटी चौकात मसाला दूध वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांच्याहस्ते व नगरसेवक प्रकाश ढंग व शेडजी मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत दूध वाटप करण्यात आले. स्वागत संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी सर्वानी व्यसनापासून मुक्त व्हा, असा संदेश दिला. संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रविण कोकरे, संतोष माने, प्रकाश व्हनकडे, विजय खोत, अरुण रूपनर, संजय तोडकर, आशुतोष धोतरे, दिनकर चव्हाण, परवेज मुलाणी, व्यापारी संघटनेचे राजेंद्र पवार, अनिल कवठेकर यांसह शहरातील संघर्ष समिती, व्यापारी व पत्रकार संघटनेचे विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. आभार सचिव विलास माळी यांनी मानले.








