बेळगाव : बकरी-ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. 21 रोजी बेळगाव शहरातील व तालुक्मयातील दारूची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी दिला आहे. सोमवारी या संबंधीचा आदेश जारी करण्यात आला.
बुधवारी सकाळी 6 ते गुरुवार दि. 22 जुलैच्या सकाळी 6 वाजेपर्यंत वाईन शॉप, बार, क्लब, हॉटेलमध्ये दारू विक्री बंदी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱया व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.









