गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांचा आरोप
प्रतिनिधी / मडगाव
फातोर्डाचे माजी आमदार तसेच व्हायबंट मडगाव पॅनलचे अध्यक्ष दामोदर नाईक हे सध्या फातोर्डा फॉरवर्डच्या उमेदवारांना मिळणाऱया पाठिंब्यामुळे वैफल्यग्रस्त बनले असून त्यांनी सरकारी कर्मचाऱयांना धमकावण्याचे सत्र अवलंबविले असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला आहे.
गोवा फॉरवर्ड पक्ष सरकारी कर्मचाऱयांच्या मागे ठामपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. फोन कॉलवरील संभाषणासह यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे तसेच यासंदर्भात तपशीलवार प्रत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठविण्यात येणार असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले आहे
भाजप सरकारने यापूर्वी सरकारी कर्मचाऱयांची गृह कर्ज योजना बंद केली. नंतर पोलीस व अन्य खात्यांतील बढत्या रोखून धरल्या. तर आता सरकारी कर्मचाऱयांना चक्क धमक्मया देण्याचे सत्र सुरू आहे. आपल्या पक्षाच्या पॅनलमधील उमेदवारांना पालिका निवडणुकीत पाठिंबा देऊन मतदान केले नाही, तर दूरवर बदल्या करू अशा व अन्य प्रकारच्या धमक्मया त्यांच्याकडून दिल्या जात असल्याचे आम्हाला काही सरकारी कर्मचाऱयांकडून कळले आहे. त्यासंदर्भातील ‘कॉल रिकॉर्डिंग’ही उपलब्ध आहे, असा दावा कामत यांनी केला आहे.
सरकारी कर्मचाऱयांसह एकंदर गोमंतकीय जनता आता भाजपाच्या राजवटीला विटली असून त्यांच्या धमक्मयांना भीक न घालता ती त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे कामत यांनी म्हटले आहे.