प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी रविवारी सायंकाळी 37 फुटी व्हेल सापडून आला. या व्हेलचा खूप दिवसांपूर्वी समुद्रामध्ये मृत्यू झाला असल्याने त्याला अत्यंत दुर्गंधी सुटलेली होती व तो कुसलेल्या अवस्थेत होता. यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी समुद्रकिनारे जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खणून त्याला समुद्र किनारीच पुरले. वनविभागाच्या अधिकार्यांना यावेळी ग्रामस्थांनी मोठी मदत केली.
यावेळी विभागीय वनाधिकारी चिपळूणचे दिपक खाडे, दापोली वनक्षेत्रपाल वैभव बोराटे, दापोली वनपाल रफिक मुल्ला, वनरक्षक महादेव पाटील, वनरक्षक सुरेखा जगदाळे, वनरक्षक सुरज जगताप यांच्यासह सुरेश तउसाळकर, प्रीतम तउसाळकर, अनिल आरेकर अनील बोरकर, संकेत तउसाळकर, जितेंद्र भुवड अमोल भोंगळे, अभिजित भोंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleसांगली : मातोश्री कोविड सेंटरला मदतीचा वाढता ओघ
Next Article रत्नागिरी जिल्ह्यात आज ६८ रुग्ण पॉझिटिव्ह









