वार्ताहर/मौजेदापोली
मिनिमहाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोली तालुक्यामध्ये पर्यटकांची गर्दी दिवाळीपासून वाढलेली आहे. त्यामुळे गेले अनेक महिन्यांपासून पर्यटकांची वाट पाहणाऱया हॉटेल, रिसार्ट व्यावसायिकांना सुगीचे दिवस दिसून आले. परंतू ही पर्यटकांची संख्या लॉकडाऊनच्या भीतीने शांत होण्याची शक्यता दापोलीतील पर्यटन व्यावसायिकांकडून वर्तविण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गणपतीपुळे या ठिकाणी 80 ते 90 टक्के पर्यटक हे पुणे येथून पर्यटनाला येतात. नोव्हेंबरच्या शेवटच्या शनिवारी-रविवारी दापोलीत बहूसंख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. काही पर्यटकांना कोणी रूम देतय का रूम अशी विचारण्याची वेळ आली आहे. परंतु 30 नोव्हेंबर नंतर मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली. पुणे येथे लॉकडाऊन करण्यास सुरूवात करण्यात आल्याने दापोलीत दाखल झालेल्या पर्यटकांना त्यांच्या नातेवाईकांकडून घरी परत येण्याबाबत फोन येवू लागले आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी रविवारी सायंकाळी घरी परतण्याचा निर्णय घेतल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी चौकशी दरम्यान सांगितले.
Previous Articleकर्नाटकमधील वैद्यकीय, दंत महाविद्यालये पुन्हा उघडणार
Next Article सांगली : कोयना धरणावर मिळाला तब्बल नऊ फुटी अजगर









