दापोली / प्रतिनिधी
पाळंदे ता. दापोली येथील एकाच समुद्रकिनाऱ्यावर एका आठवड्यात दोन डॉल्फिन माशांचा मृत्यू ओढवल्याने निसर्गप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे.
दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी गेल्या आठवड्यात एका डॉल्फिनचा मृत्यू झाला होता ही बाब ग्रामस्थांनी पत्रकार व वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन याचा पंचनामा केला व मृत डॉल्फिनला समुद्रकिनारी खड्डा काढून पुरण्यात आहे. ही घटना ताजी असतानाच रविवारी अजून एका दुसऱ्या डॉल्फिनचा मृतदेह समुद्रातून वाहत आलेला मुद्रातून वाहून येऊन किनार्याला पडलेला आढळून आला.
एकाच आठवड्यात दोन डॉल्फिनचा एकाच समुद्रकिनारी मृत्यू ओढवल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. हे डॉल्फिन नेमके कोणत्या कारणाने मृत होत आहेत याची कारण मीमांसा होऊन डॉल्फिन मृत होण्याचे कारण समोर आणणे आता गरजेचे बनले आहे.