प्रतिनिधी / दापोली
दापोली शहर परिसरात अन्नभेसळ अधिकारी असल्याचे बतावणी करत असलेल्या व्यक्तीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मात्र त्याला दापोली पोलिसांनी केवळ समज देऊन सोडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
एका संघटनेच्या नावाखाली हा युवक हॉटेल व्यावसायिकांकडून पैसे लुबाडण्याचे उद्योग करत होता. दापोलीचे उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर व प्रथितयश हॉटेल उद्योजक व माजी सरपंच व अध्यक्ष दिनेश नायक यांच्या सतर्कतेमुळे बुधावारी हा प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दल दिनेश नायक व प्रशांत पुसाळकर यांच्या जागृततेसाठी दापोली व्यापारी संघटनेतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.









