प्रतिनिधी/ दापोली
दापोली नगरपंचायतीच्या चार जागांसाठी 18 जानेवारी रोजी होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वाभूमीवर शहरात तीन दिवस ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सोमवार, मंगळवार व बुधवारी शहरातील सर्व मद्यविक्री दुकाने, बिअर बार व परमिट रूम बंद राहणार आहेत. यामुळे नागरिकांनी रविवारी मद्य विक्रीच्या दुकानांच्या मोठी गर्दी केली होती.









