प्रतिनिधी / दापोली
दापोली नगरपंचायतीच्या प्रभाग 7 मधील अपक्ष उमेदवार कृपा शशांक घाग यांचे पोस्टर रविवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याने फॅमिली माळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
कृपा घाग या नगरपंचायतमधील शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांबद्दल त्यांचे आभार मानणारे फलक त्यांच्या समर्थकांनी फॅमिली माळ परिसरात लावले होते. ते रविवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी फाडून त्याची नासधूस केली. याबाबत बोलताना विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरू लागल्याने त्यांच्याकडून हे कृत्य झाले असावे अशी बोलकी प्रतिक्रिया कृपा घाग यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.









