वार्ताहर/मौजे दापोली
दापोली तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱयासह धुवाँधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे दापोलीतील नदी-नाले तुडुंब भरले आहेत. यात 65 हजाराचे नुकसान झाले आहे.
दापोलीत बुधवारी झालेल्या पावसात सोवेली येथील सुशीला वास्कर यांच्या घरावर आंब्याच्या झाडाची फांदी पडून 35 हजार रूपये, विश्वास माटवणकर यांच्या घरावर फांदी पडून 30 हजार रूपये, तसेच कारंडे यांच्या घराच्या भिंती व छपराचे नुकसान झाले आहे. दापोलीत बुधवारी 140.2 मि. मी. पाऊस झाला असून आतापर्यंत 2672.7 मि. मी. इतक्या पावसाची नोंद दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.
वादळी पावसामुळे आडे, हर्णे, बुरोंडी, बंदरातील डिंगी अर्थात छोटय़ा होडय़ा वाहून गेल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाकडून धुवांधार पावसाची पूर्वकल्पना देण्यात आल्यामुळे दापोलीतील मासे पकडण्यास गेलेले मच्छिमार किनाऱयाला परतल्याचे समजते.









