दापोली / प्रतिनिधी:
रत्नागिरी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कर्फ्युच्या पहिल्या दिवशी दापोली पोलिसांकडून कडक नाकाबंदी करण्यात आली.
यावेळी पोलिसांनी शहरातील बुरोंडी नाका येथे अनेक जणांवर दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.









