वार्ताहर / टाळसुरे
आरटीओसमोर एसटी कर्मचाऱयांना मारहाण केल्या प्रकरणी चार संशयितांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दापोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार दापोली बसस्थानकाच्या बाहेर 100 मीटरवरच बोरिवलीसाठी विनापरवाना खासगी वाहतूक करणाऱयांवर आरटीओ अधिकारी प्रदीप बनसोडे यांनी कारवाई केली होती. त्यावेळी मदतीसाठी घेतलेले एसटी कर्मचारी विकास म्हस्के व अमोल मानवतकर यांना अज्ञाताकडून मारहाण झाली होती. याप्रकरणी दापोली पोलिसांनी संशयित म्हणून सूर्यकांत कालेकर (49, करंजाणी-मावळतवाडी, सुशांत झिमण (25, म्हाळुंगे), गौरव पाटणे (21, वणौशी) व अन्य एक अशा चौघांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी तालुक्यातील खासगी वाहतूक करणाऱया वाहतूकदारांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावण्यात आले होते. धक्काबुक्की झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून ताब्यात घेतलेल्या व्य‹ाRची चौकशी सुरू आहे. लवकरच मारहाण करणाऱयास ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास याप्रकरणी तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी सांगितले.
Previous Articleवाडा भराडे शाळेत पोषण आहार वाटपात गोंधळ
Next Article योग्य आहार व योग्य झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली









