वार्ताहर / मौजेदापोली
दोन दिवसांपासून दापोलीच्या थंडीत घट होवून तापमानात वाढ झाल्याने नागरीकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. शेकोटी पेटविण्यादिवशी पंख्याचा वारा घेण्याची वेळ सध्या आली आहे.
मागील दोन ते तीन दिवस दापोलीत थंडीने दापोलीकरांना चांगलेच गारठवले होते. परंतु अचानक थंडी गायब झाल्याने गर्मीत मोठी वाढ झाली आहे. दापोलीचा कमाल तापमान 34.8 तर किमान तापमान 21.6 अंश सेल्सिअस असल्याचे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे. काजू, तर काही आंब्याच्या झाडांना मोहोर फुटू लागला आहे. परंतु अचानक पडलेल्या उन्हामुळे आलेला मोहोर करपून जातो की काय असा प्रश्न आता बागायतदारांना सतावत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









