दापोली / प्रतिनिधी:
दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन दिवस झालेल्या धुवाँधार पावसाने संरक्षक भिंत कोसळली. यामुळे हर्णे बायपास रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
दापोली तालुक्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरलेला असल्याने सावधतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यात गुरुवारी सकाळी दापोली हर्णे अडखळ मार्गावरील एका विकासकाने बांधलेली संरक्षक भिंत हर्णे बायपास रोडवर कोसळली. यानंतर दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील व दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर आलेली माती व चिरे जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून व रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला.









