दापोली -/ प्रतिनिधी
दापोलीतील शिक्षण, उद्योग व सहकार क्षेत्रातील महर्षी संतोष उर्फ संतोषभाई मेहता यांचे शुक्रवारी पुणे येथे दुःखद निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.
संतोष मेहता हे श्रीराम शिक्षण संस्था व संतोषभाई मेहता फाउंडेशनचे अध्यक्ष होते. तसेच ते दापोलीतील गोपाळकृष्ण पतसंस्था व खेड येथील मुरलीमनोहर पतसंस्था यांचे संस्थापक संचालक व माजी अध्यक्ष आणि लायन्स क्लबचे जेष्ठ सदस्य देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे.