मौजेदापोली /वार्ताहर
दापोली येथील रहिवासी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद दिनकर जोशी यांचे नुकतेच पुणे येथे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.
कै. डॉ. जोशी यांनी कृषी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून तर उद्यान विद्या विभागाचे प्रमुख, त्यानंतर ते शिक्षण संचालक म्हणून काम केले. त्यांनी विद्यापीठात 35 वर्ष सेवा बजावली. त्याच बरोबर दापोली येथील कुणबी सेवा संघांचे ते उपाध्यक्ष म्हणून काम पहात होते. जोशी यांनी विद्यापीठासह अनेक संस्थावर विविध पदांवर काम केले आहे. त्यांच्या निधनाने सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









