प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील पिसई आरोग्य केंद्रात चार सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या लसीची कुठेही कागदोपत्री नोंद नसल्याने सदर लस ही संशयास्पद असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी सभापती राजेश गुजर यांनी आज शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून आरोग्य विभागाकडे याबाबत लेखी खुलासा मागविण्यात आलेला आहे.
यामुळे या लसीकरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून ही लस खरी होती की बोगस असा प्रश्न देखील माजी सभापती राजेश गुजर यांनी उपस्थित केला आहे. उद्या आरोग्य विभाग याबाबत सभापतींकडे कोणता लेखी खुलासा करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Previous Articleसांगली : जान्हवीच्या मदतीसाठी धावला अभिनेता अक्षय कुमार
Next Article घरपट्टी विरोधाचा ठराव सहा महिन्यापूर्वीच









