‘तरुण भारत’ कडून स्टिंग ऑपरेशन
प्रतिनिधी / दापोली
निसर्ग व तौक्ते वादळात निसर्ग संपदा गमावलेल्या दापोलीत एकीकडे दापोलीतील सामाजिक संस्था व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ‘झाडे लावा झाडे जगवा’चा नारा देत आहे. मात्र, दुसरीकडे विद्यापीठाच्या वाकवली क्षेत्र लगत असणाऱ्या प्राईज फार्म येथे 25 एकर एकरात विनापरवाना बेसुमार वृक्षतोड होत असल्याचे समोर आले आहे. दिवसाढवळ्या सुरु असणाऱ्या या गोरखधंद्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
येथे 25 एकरात विनापरवाना बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. ‘तरुण भारत’ला या गोष्टीचा सुगावा लागल्यावर तरुण भारत टीमने घटनास्थळी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात झाडे तोडलेली व तोडून ठेवलेली झाडे अनेक ठिकाणी रचून आढळून आली. तसेच कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना वृक्षतोड होत असल्याची कबुली झाडे तोडणार्या ठेकेदाराने दिली. विद्यापीठाच्या वाकवली प्रक्षेत्राच्या लगत सुरू असणारी ही बेसुमार वृक्षतोड ‘तरुण भारत’ने वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. यावर आपण संबंधितांवर कडक कारवाई करू असे आश्वासन येथील वनाधिकारी श्री. सावंत यांनी तरुण भारतशी बोलताना दिले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









