वार्ताहर / मौजे दापोली
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असणाऱ्या दापोलीचा पारा 12 अंश सेल्सिअसवरून सरळ 10.4 अंश सेल्सिअसवर घसरल्याने दापोलीकरांना चांगलीच हुरहूडी भरली आहे.
गेले अनेक दिवस थंडी गायब झाली होती. त्यानंतर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ढगाळ वातावरण, पाऊस होता. त्यामुळे शेतकरी, बागायतदार चिंतेत होते. असे असताना पुन्हा एकदा थंडीने आपले स्थान प्रस्थापित केले आहे. रविवारी दापोलीचे कमाल तापमान 32.2 तर किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअस इतके असल्याचे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे. यामुळे दापोलीकर चांगलेच गारठले आहेत.