अंबानींचा तिसरा क्रमांक : मागील वर्षातील आकडेवारी
मुंबई
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे समाजकार्यास दान देणाऱयांमध्ये अव्वल स्थानी राहिले आहेत. प्रेमजी हे नेहमी समाज कार्यास आपल्या संपत्तीमधील वाटा देत आले आहेत. मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये त्यांनी जवळपास 7,904 कोटी रुपयांचे दान केले आहे. याच्या आधारे दान देणाऱयामध्ये सर्वोच्च स्थान मिळवले असल्याची माहिती हारुन इंडियाच्या अहवालात आणि ऍडेलगिव फाउंडेशनच्या अहवालामधून सांगितली आहे.
प्रेमजी यांनी या स्पर्धेत आघाडीवर असणाऱया एचसीएल टेकचे शिव नाडर यांना मागे टाकले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.









