प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या दादर-सावंतवाडी-दादर स्पेशल रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी रोज रात्री दादरहून रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हा वेळेचा बदल तात्काल लागू करण्यात आला आहे. ट्रेन नं 01003 दादर-सावंतवाडी रोड स्पेशल रोज रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी दादरहून रवाना होणार आहे. ही रेल्वे सावंतवाडी रोड स्थानकात सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे. ट्रेन नं. 01004 सावंतवाडी रोड- दादर स्पेशल रोज 19 वाजून 10 मिनिटांनी सावंतवाडी रोड स्थानकातून रोज रवाना होईल. हि रेल्वे सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी दादर येथे पोहोचणार असल्याचे कोकण रेल्वे पशासनाने जाहीर केले आहे.









