ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना विषाणू धुमाकूळ घालत आहे. त्यात आता तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुन याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतः बुधवारी सकाळी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

अल्लू अर्जुन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, सर्वांना नमस्कार, मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना विनंती करतो की, त्यांनी देखील आपापली चाचणी करून घ्यावी. मी माझ्या सर्व हितचिंतकांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, काळजी करू नका कारण मी ठीक आहे. तसेच जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा लस टोचून घ्या आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरी रहा, सुरक्षित रहा.
त्याची ही पोस्ट पडताच त्याच्या चाहत्यांनी अल्लू अर्जुन लवकरात लवकर बरे व्हावा यासाठी प्रार्थना केली आणि त्याला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सुपरस्टार अल्लू अर्जुनने 2003 मध्ये ‘गंगोत्री’ चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून पदार्पण केले. अर्जुनने ‘फिल्मफेअर’ आणि ‘नंदी’ पुरस्कार जिंकले आहेत. त्याने मनोरंजन विश्वाला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अल्लू अर्जुनचे स्नेहा रेड्डीशी लग्न झाले आहे. अल्लू आणि स्नेहाचे 6 मार्च 2011 रोजी लग्न झाले. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.









