ऋषिकेशमध्ये उद्योजक अक्षय कुमारसोबत विवाह
स्वागता ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रख्यात गायिका, नृत्यांगना आणि संगीतकार म्हणून ओळखली जाते. स्वागताने अलिकडेच बेंगळूर येथील उद्योजक अक्षय कुमारसोबत विवाह केला आहे.

स्वागता एस. कृष्णनने स्वतःच्या सोशल मीडिया अकौंटवर पती अक्षय कुमारसोबतची छायाचित्रे शेअर केली आहेत. यात दोघेही वधूवराच्या पोशाखात दिसून येतात. उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये गंगा नदीच्या काठावर आणि हिमालयाच्या पायथ्याशी हा विवाह केला आहे. 4 मार्च रोजी दोघांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार या सोहळय़ाला उपस्थित होता.
आमचे आईवडिल, आमचे गुरु आणि आम्हाला एकत्र आणणाऱया सर्व लोकांच्या आशीर्वादाने गंगेच्या काठावर ऋषिकेशमध्ये अक्षयशी विवाह केला आहे. या यात्रेला सन्मान, समानता आणि प्रेमासह सुरुवात करतो असे अभिनेत्रीने नमूद पेले आहे. स्वागताला चित्रपटसृष्टी तसेच चाहत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.









