प्रतिनिधी / खेड
कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके येथील १३ स्थावर मालमत्तांची लिलाव प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पूर्ण होणार आहे. या लिलाव प्रक्रियेत मुंबकेतील स्थानिक ग्रामस्थही पुढे सरसावले आहेत. या लिलाव प्रक्रियेकडे साऱ्यांच्या नजरा रोखल्या आहेत.
चार दिवसापूर्वी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दाऊद इब्राहिम याच्या मुंबकेतील मालमत्तांची बोलीधारकांसह पाहणी केली. या मालमत्तेसह लोटे येथील प्लॉटचाही लिलाव होणार आहे. मुंबके येथे सर्व्ह क्र. १८१ मध्ये दाऊदचा दोन मजली बंगला असून सर्व्हे क्र. १५०, १५१, १५२, १५३, १५५ या जमिनीचा समावेश आहे. या सर्व राखीव मालमत्तांची किंमत १४ लाख ४५ हजार २०० रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
लोटे येथील ३० गुंठ क्षेत्र असलेल्या भूखंडाची राखीव किंमत ६१ लाख ४८ हजार १०० रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. या सर्व मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मालमत्ता लिलावात स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला असून तसे अर्ज देखील दाखल केले आहेत. शुक्रवारपर्यंत लिलावाची अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ही मालमत्ता स्थानिकांना देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी देखील मुंबके ग्रामपंचायतीचे सरपंच अकबल दुदुके यांनी केली आहे.
Previous Articleविद्यापीठ कर्मचार्यांचे उद्या सामूहिक रजा आंदोलन
Next Article खेडमध्ये नगरप्रशासन खोकेधारकांमध्ये शाब्दिक चकमक









