साहित्य : 200 ग्राम पनीर, 2 लवंगा, 2 काळीमिरी, 1 छोटा दालीचीनी तुकडा, 1 कांदा चिरून, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 1 वाटी कच्च्या टॉमेटोची प्युरी, 6 चमचे काजू पेस्ट, पाव वाटी दही, 1 चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा चाट मसाला पावडर, दीड चमचा लाल तिखट, 2 चमचे पुदिना पाने चिरून, 2 चमचे मलई, 4 चमचे तेल, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा साखर
कृती : गरम तेलात अख्खा मसाला परतवावा. नंतर कांदा टाकून परतवावा. आता आलं-लसूण पेस्ट टाकावी. टॉमेटो प्युरी घालून त्याचा कच्चा वास जाईस्तोवर मंद आचेवर शिजू द्यावे. नंतर काजू पेस्ट घालून 3 ते 4 मिनिटे शिजवावे. आता पनीर घालावे. नंतर दही व इतर साहित्य आणि मीठ घालून मंद आचेवर दोन मिनिटे शिजवावे. आता पुदिना, मलई आणि साखर टाकावी. झाकण ठेवून दहा मिनिटे शिजू द्यावे. तयार भाजी किसलेल्या पनीरने सजवून रोटीसोबत खाण्यास द्या.