साहित्यः
अर्धा किलो चिकन, चिमुटभर मीठ, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 1 कांदा बारीक चिरून, 1 चमचा बटर, 1 वाटी दही, 1 चमचा क्रीम, पाव चमचा वेलची पावडर, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा काळीमिरी, वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर
कृतीः
चिकन स्वच्छ करून थोडय़ाशा कोमट पाण्यात मीठ टाकून 15 मिनिटे ठेवावे. नंतर निथळून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून बाऊलमध्ये काढावेत. आता मॅरीनेटसाठी चिकनमध्ये हिरवी मिरची पेस्ट, दही, आलं-लसूण पेस्ट, वेलची पावडर आणि मीठ मिक्स करून दोन तास झाकूण ठेवावे. आता बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून हलक्या गुलाबी रंगावर परतवून घ्यावा. नंतर त्यात मॅरीनेट चिकन मिक्स करून दोन मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे. आता मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून पंधरा मिनिटे मंद आचेवरच शिजवून घ्यावे. आता आच बंद करून वरून क्रीम घालावे. मिश्रण हलक्यावर मिक्स करून वरून कोथिंबीर आणि काजू तुकडे पसरवावेत. तयार दही चिकन पराठा अथवा नानसोबत खाण्यास द्या.