तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील राहीलेले सर्व प्रश्न सोडविणार असुन, दहीगांव उपसासिंचन योजना २०२४ पर्यंत शंभर टक्के पूर्ण करून १०,५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार असल्याचे प्रतिपादन करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी देवळाली येथे आयोजित जाहीर प्रवेश कार्यक्रम प्रसंगी केले.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांनी आपल्या ७ ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांसमवेत आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी आ. शिंदे व माजी आ.जयवंतराव जगताप यांच्या हस्ते आशिष गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. उपसरपंच प्रतिनिधी धनंजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पोपट बोराडे, गहिनीनाथ गणेशकर, किसन चांदणे यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी यावेळी आ. शिंदे गटात प्रवेश केला. तसेच नेरलेचे माजी उपसरपंच काकासाहेब पाटील, लतीफ पटेल, महादेव लोंढे, रावसाहेब काळे यांनीही आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला.









