ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील कोविड सेंटर हे सत्ताधारी नेत्यांचे कमाईचे साधन आहे. येत्या दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
सोमय्या म्हणाले, मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत. मात्र, आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचे काम सुरू आहे. बीकेसीमध्ये 2400 बेडपैकी केवळ 800 बेड्सवर रुग्ण ऍडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण तिथे अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगावमध्ये 2000 बेड्स असलेल्या रुग्णालयात 900 रुग्ण दाखल आहेत. म्हणजेच 98 टक्के रुग्ण घरीच बरे होत आहेत. लसीकरण झालेले 99.99 लोक हे सुरक्षित आहेत. मात्र, सत्ताधारी नेत्यांकडून लोकांना घाबरवण्याचे काम सुरू आहे. कारण कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन आहे. येत्या दहा दिवसात मी ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार आहे.








