दिल्ली/प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारवीच्या सीबीएसई परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याविषयी माहिती दिली आहे.
परीक्षा ४ मे ते १० जून या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. मंडळाने म्हटले आहे की त्यांनी परीक्षेच्या तीन महिन्यांपूर्वी वेळापत्रक जाहीर केले आहे जेणेकरुन त्यांनी त्यांचा अभ्यास योजना तयार करता यावी.
दोन मुख्य विषयांच्या परीक्षांमध्ये पुरेसा अवधी देण्यात आला असल्याचे मंत्र्यांनी वेळापत्रक जाहीर करताना सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल, असेही ते म्हणाले. मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://www.cbse.gov.in/cbsenew/documents//FINAL-Date%20Sheet%2002.02.2021%20-%20X.pdf
बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.cbse.gov.in/cbsenew/documents//FINAL%20Date%20Sheet%2002.02.2021%20-%20XII.pdf









