प्रतिनिधी/सांगली
दहावी आणि बारावीच्या बोर्ड परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. परिक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.
बोर्डच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परिक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावी २९ एप्रिल ते २० में दरम्यान होणार आहे. सांगली जिल्ह्यात बारावीसाठी ४९ केंद्रे आणि ३३ हजार ९० परिक्षार्थी आहेत तर दहावीसाठी १०३ केंद्र आणि ४० हजार ८४४ परिक्षार्थी आहेत . माध्यमिक शिक्षण विभागाने परिक्षेची सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. भरारी पथकासह विविध उपायोजना केल्या आहेत वाढला कोरोनामुळे परिक्षेबाबत पालक तसेच विद्यार्थ्यामध्ये संभ्रम होता मात्र परिक्षेचा वेळापत्रक त कोणताही बदल करण्यात आला नाही.
माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णु कांबळे म्हणाले, परिक्षेची तयारी झाली आहे पूर्वीप्रमाणे एका बेंचवर एक विद्यार्थी या प्रमाणेच बैठक व्यवस्था असेल. परिक्षेबाबत नवीन मार्गदर्शक कोणत्याही सूचना नाहीत त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश पत्रिका देण्यात येत आहेत.
Previous Articleजितेंद्र आव्हाडांकडून रक्तदान करण्याचे आवाहन
Next Article तैवानमध्ये रेल्वे अपघातात 36 ठार, 72 जखमी








