प्रतिनिधी / बेंगळूर
केंद्र सरकारकडून राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच असून सोमवारी देखील 120 मेट्रीक टन ऑक्सिजन रेल्वेने पाठवून देण्यात आले. बेंगळूरमध्ये आलेली ही दहावी ऑक्सिजन एक्स्प्रेस आहे. 10 मे रोजी बेंगळूरच्या व्हाईटफिल्ड येथे पहिली रेल्वे सहा कंटेनरमधून ऑक्सिजनसह दाखल झाली होती. रविवारी देखील 120 मे. ऑक्सिजन रेल्वेने उपलब्ध झाले होते.
झारखंडच्या टाटानगर येथून सोमवारी दुपारी 120 टन ऑक्सिजन घेऊन आलेली एक्स्प्रेस व्हाईटफिल्ड रेल्वे स्थानकावर दाखल झाली. राज्याला आतापर्यंत रेल्वेने 1,182.14 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध झाले आहे. हा साठा बेंगळूर शहरातील विविध इस्पितळांना आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात आला आहे. रेल्वेने सातत्याने ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने बेंगळूरमधील इस्पितळांना अनुकूल होत आहे.









